सुशांतने धुडकावली फेअरनेस क्रिमची जाहिरात


अभिनेता अभय देओलने मागील वर्षी चेहऱ्याच्या रंग उजळवणाऱ्या क्रिमची जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर जोरदार टीका केली होती. अशाप्रकारच्या जाहिराती करणाऱ्यासंदर्भात यानंतर वाद-विवाद रंगला होता. पण आता अभय देओलची ही मोहीम सुशांतसिंह राजपूत पुढे नेताना दिसत आहे.

एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची ऑफर नुकतीच सुशांतने धुडकावली आहे. त्याला या जाहिरातीसाठी १५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. याबाबत सुशांत म्हटले आहे कि, अशाप्रकारच्या वस्तूंची जाहिरात करुन समाजात चुकीचा मेसेज जातो. एखाद्या वस्तूबाबत चुकीचा मेसेज जाऊ ही अभिनेत्याची जबाबदारी आहे. ‘राबता’ या चित्रपटात दिसलेला सुशांत सिंह राजपूत आगामी ‘ड्राईव्ह’ आणि ‘चंदा मामा दूर के’च्या चित्रीकरणात व्यस्क आहे. तसेच तो ‘केदारनाथ’ नावाच्या चित्रपटात सारा अली खानसोबतही झळकणार आहे.