‘कुछ कुछ होता है’चे त्रिकुट झळकणार ‘झीरो’मध्ये


शाहरुख खान आणि काजोल या जोडीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पण काजोल आता पुन्हा एकदा शाहरुखसोबत झळकणार असून काजोलचीही आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या किंग खानच्या आगामी चित्रपटात भूमिका आहे.

शाहरुखसोबत ‘झिरो’मध्ये कतरिना आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काजोल आणि राणी मुखर्जी पाहायला मिळतील. शूटिंगचा अनुभव व्यक्त करताना राणीने ‘कुछ कुछ होता है २’साठी काम केल्यासारखे वाटल्याचे सांगितले. प्रेक्षकांनी ‘कुछ कुछ होता है’ या सुपरहिट चित्रपटातील शाहरुख, राणी आणि काजोल यांच्यातील प्रेमाच्या त्रिकोणाला चांगलीच दाद दिली होती. जवळपास अर्ध्या तासाचे आम्ही शूटिंग केले. पण शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव काही औरच असतो असे काजोलने म्हटले आहे.