यापुढे पासपोर्टचा हा दर्जा होणार निष्क्रीय


नवी दिल्ली : पासपोर्ट हा आतापर्यंत अधिकृत रहिवासी दाखला मानला जात होता, पण आता परराष्ट्र मंत्रालयाला आलेल्या प्रस्तावानुसार पासपोर्टचा हा दर्जा यापुढे जाण्याचे चित्र सध्या आहे. पासपोर्टवर शेवटच्या पानवर असलेला धारकाचा पत्ता हटवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

पासपोर्टचे शेवटचे पान नवी सीरिज आणताना ब्लँक ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असून हे पाऊल पासपोर्टचे तपशील संरक्षित ठेवण्यासाठी उचलले जाणार आहे. यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे. पण अद्याप या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सध्या, पासपोर्टच्या पहिल्या पानावर फोटो आणि पासपोर्टधारकाचे इतर तपशील छापलेले असतात, तर पत्ता शेवटच्या पानावर असतो. पण पासपोर्ट ऑफिस आणि इमिग्रेशन विभाग (किंवा सुरक्षा अधिकारी) यांच्याकडे पासपोर्टधारकाचा पत्ता असल्यामुळे शेवटचे पान असो, वा नसो, काहीच फरक पडत नाही. सर्वच पासपोर्टवर २०१२ पासून बारकोड लावण्यात आले असून ते स्कॅन करताच ही माहिती उपलब्ध होऊ शकते. नवीन सीरिज आणल्यानंतरही सद्य पासपोर्ट त्यांच्या एक्स्पायरी डेटपर्यंत वैध राहतील.

Web Title: Passport status will no longer be passive