‘पद्मावत’ला गुजरातमध्येही नो एंट्री


अहमदाबाद – पद्मावत (पूर्वीचे पद्मावती) या चित्रपटाचे शुक्लकाष्ट संपण्याचे काही नाव घेत नाही. मध्यप्रदेशमध्ये पाठोपाठ राजस्थानमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. आता त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी देखील पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय ‘पद्मावत’च्या विरोधात गुजरातमध्ये निदर्शने झाल्याने घेतल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्पष्ट केले. पद्मावत चित्रपटात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी बदल केले तरी प्रदर्शित केला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. पद्मावत हा चित्रपट १३ व्या शतकातील राणी पद्मावतीवर आधारित आहे. यामध्ये ऐतिहासिक सत्याचा विपर्यास केल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने ५ कट चित्रपटात सुचविले होते. तसेच पद्मावती चित्रपटाचे नाव पद्मावत करण्याचे डिसेंबरमध्ये सुचविले होते.