एमआयएम नगरसेविकेचा नागिण डान्स पाहिला का?


पुराणवादी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या एका नगरसेविकेच्या नागिण डान्सचा व्हिडियो सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. मात्र हा व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे मुस्लिम समुदायात नाराजीचे वातावरण आहे.

सोशल मीडियात हा व्हिडियो व्हायरल झाला आहे. त्यामुळे पक्षात तर वादळ उठले आहेच, पण पक्षाबाहेरही मोठा विरोध होत आहे. या व्हिडियोत कुर्नूल जिल्ह्यातील कमीरगुडा येथील नगरसेविका डॉ. समीना बेगम या नागिण डान्स करताना दिसतात. तेथील स्थानिक यूनानी मेडिकल कॉलेजमध्ये नववर्षाच्या कार्यक्रमात डॉ. समीना यांनी हा नाच केल्याचे सांगितले जाते. डॉ. समीना याही याच महाविद्यालयात शिकल्या आहेत.

व्हिडीओ सौजन्य – Adya Media
डॉ. समीना व्यासपीठावर उभ्या असून नागिण धून सुरू होताच त्या नाचताना सुरू करताना व्हिडियोत दिसतात. आपली नगरसेविका नाचताना पाहून व्यासपीठावर उपस्थित पुरुषही नाचताना त्यात दिसतात.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी मला आग्रह केला म्हणून मी काही वेळ नृत्य केले असून मी काहीही वावगे केलेले नाही, असे डॉ. समीना यांनी वाहिन्यांशी बोलताना सांगितले.