लॅम्बॉर्गिनीची ‘उरूस’ भारतात दाखल


मुंबईमध्ये नुकतेच इटलीमधली आघाडीचे कारमेकर लॅम्बॉर्गिनीच्या पहिल्या सुपर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल ‘ऊरूस’चे लाँचिंग करण्यात आले आहे. सुमारे ३ कोटी रुपये या कारची किंमत असून भारतातील विक्रीमध्ये या नव्या मॉडेलमुळे अडीच ते तीन पटींनी वाढ होण्याची आशा कंपनीला आहे. भारतीय बाजारपेठ लॅम्बॉर्गिनीसाठी महत्त्वाची असल्याचे कंपनीच्या आशिया पॅसिफीक क्षेत्राचे महाव्यवस्थापक अँड्री बाल्डी यांनी मुंबईमध्ये झालेल्या ऊरूसच्या लाँचिंगवेळी म्हटले आहे. भारतामध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल सेगमेंटवर कंपनी अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे लॅम्बॉर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल यांनी म्हटले आहे.