खडसे भाजपत राहणार नाहीत – संजय राऊत


जळगाव- भाजप पक्षाच्या वाढीत बहुमुल्य योगदान देणारे त्यांचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या खूप अस्वस्थ अाहेत. त्यांनी वेळोवेळी भाजप-सेना युती ताेडण्याची घाेषणा केली. पण ती भूमिका त्यांच्या पक्षाची हाेती. अामचे त्यांच्यासाेबत ममत्व नसले तरी आम्हाला त्यांच्याविषयी सहानुभूती नक्कीच अाहे. पण सध्याची परिस्थिती पाहता ते काेणत्याही पक्षात जातील, परंतु भाजपमध्ये राहणार नाही, असे भाकीत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी जळगावात अायाेजित पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, खडसेंच्या ताेंडून अनेकदा युती ताेडण्याची घाेषणा झाली. खडसेंनाच युती ताेडण्याचा सर्वाधिक अानंददेखील झाला हाेता. त्यांचे त्यावेळी मुख्यमंत्री हाेण्याचे स्वप्न हाेते. त्यांच्या डाेक्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेला संपवण्याचा विचार हाेता. पण शिवसेनेवर तलवार उगारणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व धाेक्यात येत असल्याचा इतिहास अाहे. तरीदेखील अाम्हाला खडसेंविषयी सहानुभूती अाहे. शिवसेनेत अाले तर त्यांच्यासाठी चर्चेची दारे उघडी अाहेत. सध्या अजित पवारांच्या कानातच अधिक गाेष्टी खडसे सांगत असतात. राज्यात सध्याची स्थिती पाहता मुख्यमंत्री बदल हाेणार नाही. भाजपचे मंत्री गिरीश बापट यांनी परवा वर्षभरात निवडणुका हाेण्याचे जाहीर संकेत दिले अाहेत. त्यांच्या ताेंडून भाजपची भूमिकाच बाहेर पडली अाहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेसाठी राज्यात सत्ता बदलणे सहज शक्य अाहे. पण सक्षम पर्याय समाेर नसल्यामुळे सरकारमध्येच राहून कामे करून घेण्याची शिवसेनेची भूमिका अाहे. भाजपचा गुजरात विधानसभा निवडणुकीत नैतिक पराभव झाला अाहे. या निवडणुकीने राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेतृत्व मिळाल्याचे राऊत या वेळी म्हणाले.