जिओने पुन्हा बदलले आपले नवे प्लान; पण ग्राहकांचा फायदा नक्की


नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपले नुकतेच नवे प्लान आणले होते. पण आता त्यांनी आपल्या नव्या प्लानमध्ये बदल केले असून आता जिओने आपले नवीन प्लान्स लाईव्ह केले आहेत.

आता या प्लान्सचा फायदा जिओ ग्राहकांना मिळेल. काही दिवसांपूर्वी आपल्या ८ नवीन प्लान्सची जिओने घोषणा केली होती. त्यावेळी ५०९ रूपये आणि ७९९ रूपयांच्या प्लान्सची माहिती दिली गेली नव्हती. पण आता जिओकडे १९ रूपयांपासून ते ९,९९९ रूपयांपर्यंतचे प्लान्स उपलब्ध आहेत.

रिलायन्स जिओच्या ५०९ रूपयांच्या प्लानमध्ये प्रत्येक दिवशी ३ जीबी डेटा दिला जात आहे. हा प्लान ८४ जीबी असून याची व्हॅलिडीटी ४९ दिवसांवरून २८ दिवस करण्यात आली आहे. त्यासोबत ७९९ रूपयांच्या प्लानमध्ये प्रत्येक दिवशी ५ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमध्ये याआधी दरदिवशी ३ जीबी डेटा दिला जात होता. या प्लानची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे.

जिओकडे १९ रूपये, ५२ रूपये आणि ९८ रूपयांचे प्लान आहेत. १९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी १ दिवसाची आहे आणि यात ०.१५ जीबी डेटा दिला जाणार. ५२ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी ७ दिवस असून यात १.०५ जीबी डेटा दिला जाणार आणि ९८ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी १४ दिवस आहे ज्यात २.१ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि एसएमएसचाही फायदा मिळेल.

Web Title: JIO has changed its new plan; But the benefits of the customers are exactly