भाऊच्या आगामी ‘नशीबवान’चा फर्स्ट लूक प्रदर्शित


अभिनेते भाऊ कदम लवकरच ‘नशीबवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर दाखल होत असून नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलाय. या चित्रपटाद्वारे सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. त्यांनीच कथा – पटकथा – संवाद आणि सिनेमॅटोग्राफी या जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.

राज्य शासनाचा गोळे यांची निर्मिती असलेल्या ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार, पिफ (२०१६) मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला पिफ (२०१५)मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि गोळे यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेल्या ‘हा भारत माझा’ला ‘पिफ’मध्ये संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आलंय. ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (पिफ) च्या स्पर्धा विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे.