भीमा-कोरेगावसारख्या घटना पुन्हा घडू नये याची काळजी घ्या; मोदींचे कार्यकर्त्यांना आदेश


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना कोरेगाव-भीमासारख्या घटना होऊ देऊ नका, असा आदेश दिला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करा. जातीय विद्वेष रोखा. समाजात फुट पाडणाऱ्यांना धडा शिकवा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, फूट पाडणाऱ्या या घटना आहेत. पण काहीही अघटित संघ आणि भाजप घडू देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

भीमा-कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले.