रामूच्या चित्रपटाद्वारे आणखी एका पॉर्न स्टारचे बॉलीवूड पदार्पण


पुन्हा एकदा धमाका करत बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माने त्याच्या आगामी गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथचा (GST) फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अतिशय बोल्ड असे या चित्रपटाचे पोस्टर असून त्याने ते ट्विटरवर शेअर केले आहे. त्याने या चित्रपटात प्रसिद्ध पॉर्न स्टार मिया मालकोवाला संधी दिली असून मिया पोस्टरमध्ये फारच बोल्ड अंदाजात दिसत आहे.

नुकतेच एका अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवासोबत राम गोपाल वर्माने युरोपमध्ये व्हिडीओचे शूटिंग केले. या चित्रपटाचा ट्रेलर १६ जानेवारीला सकाळी ९ वाजता लॉन्च होणार आहे. मिया मालकोवाने ट्विटरवर राम गोपाल वर्मासोबत काम केल्याचा अनुभव शेअर केला. युरोपमध्ये माझ्यासोबत गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ नावाचा व्हिडीओ भारतीय दिग्दर्शक राम गोपाल वर्माने शूट केला. सनी लिओननंतर भारतीय दिग्दर्शकासोबत काम करणारी मी दुसरी अडल्ट स्टार आहे, असे ट्वीट मिया मालकोवाने म्हटले आहे. यावेळी राम गोपाल वर्माचे आभारही तिने मानले.


राम गोपाल वर्मा मियाच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, मिया… गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथचे चित्रिकरण हा विचार आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा अनुभव होता. मला यातून अनेक आयडिया मिळाल्या आहेत. मी कधीही सनी लिओनसोबत काम केले नाही, पण गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथच्या शूटिंगचा अनुभव मी कधीही विसरु शकत नाहीत.


रामगोपाल वर्मा पुढे असे म्हटले आहे कि मिया मालकोवा, तू जशी आहेस, त्यासाठी मी तुझे आभार मानतो आणि ज्या पद्धतीने स्वत:चे विचार मांडण्याची पद्धत आहे, त्याचे कौतुक आणि सन्मान करतो. तू एक कलाकृती आहे आणि मी केवळ एक फ्रेम बनवण्याचे काम करत आहे. राम गोपाल वर्मा आणखी एका ट्वीटमध्ये म्हणाला की, येथे जीएसटी टॅक्स म्हणून नाही तर गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ आहे. या चित्रपटाचे मिया मालकोवासोबत चित्रीकरण केले. एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शक-निर्मात्यांनी सनी लिओननंतर एखाद्या अडल्ट स्टारसोबत काम करण्याची ही दुसरी वेळ आहे.