अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


न्यूयॉर्क : आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस ओळखला जाणार आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सने बेजोसला पहिले स्थान दिले आहे.

ब्लूमबर्गच्या मते, बेजोसची बुधवारपर्यंत संपत्ती १०६ अब्ज डॉलर एवढी होती. तर त्याची संपत्ती फोर्ब्सनुसार १०५ अब्ज डॉलर एवढी आहे. हा विक्रम याआधी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. त्याची संपत्ती १९९९साली १०० अब्ज डॉलर एवढी होती. पण बेजोसने त्याचा विक्रम आता मोडीत काढला आहे. बेजोसकडे अमेझॉनच्या शेअरमधून सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. त्याचे शेअर २०१७मध्ये जवळजवळ ५७ टक्क्यांपर्यंत पोहचले होते. दरम्यान, बिल गेट्स आजही श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती ९२ अब्ज डॉलर आहे.