या जागी भेट देत असाल तर मरणाच्या तयारीने जा


जगात पर्यटनासाठी अनेक स्थळे आहेत. त्यातील बरीच त्यांच्या खास वैशिष्ठ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातील कांही धोकादायक म्हणूनही नावारूपाला आली आहेत. मात्र जगातील सर्वात धोकादायक पर्यटनस्थळ म्हणून दक्षिण व उत्तर कोरियाच्या सीमेवरील पनमुन झोन या गावाची गणना केली जाते. कारण येथे येणार्‍यांना प्रथमच तुम्हाला मरण येण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर आता पाऊल टाका अशी सूचना दिली जाते. तसेच येथे प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला कांही कागदपत्रांवर सही करावी लागते. त्यावर स्वच्छपणे या भागात तुमचा मृत्य ओढवू शकतो व याची माहिती तुम्हाला दिली गेली आहे असे लिहिलेले असते.

सध्या हे ठिकाण जगाभरात चर्चेत आले आहे कारण या जागी दक्षिण व उत्तर कोरियांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. दक्षिण कोरियामध्ये हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत व त्यात उत्तर कोरियाचे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे त्यासंदर्भात ही चर्चा होत आहे.

येथे युद्धबंदी जाहीर केली गेली आहे त्याला ६४ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे मात्र तरीही या जागेवर नेहमीच मृत्यूचे सावट पडलेले असते. कारण उत्तर कोरियातून पळून जाणारे बरेचदा याच मार्गाचा वापर करतात व सैनिक त्यांना पकडून यमसदनी पाठवितात. पनमुन झोन हे ठिकाण म्हणजे उत्तर व दक्षिण कोरियाची सम मालकी असलेली जागा आहे. या दोन देशात झालेल्या १९५३ सालच्या युद्धानंतर हा नो वॉर झोन जाहीर केला गेला आहे येथे सैन्य ठेवता येत नाही तसेच शस्त्रेही साठविता येत नाहीत. मात्र तरीही कुठल्या देशाच्या सैनिक त्याच्या देशाच्या सीमेमधून तुमच्यावर गोळीबार करेल याची शाश्वती नाही म्हणूनच येथे येणार्‍यांनी मरणाच्या तयारीने यावे असे म्हटले जाते.

Leave a Comment