अंडे न फोडता उंचावरून टाका- अॅपलची ७६ लाखांची नोकरी तुमची


जगात सॉफ्टवेअर क्षेत्रात सर्वाधिक पॅकेज देणारी अशी अॅपल कंपनीची ख्याती आहे. अर्थात ही नोकरी मिळविणे हे वाटते तितके सोपे मुळीच नाही. यात सर्वाधिक मोठे आव्हान असते ते इंटरव्यू क्रॅक करण्याचे. अॅपलमध्ये नोकरी मिळवू इच्छीणार्‍याकडे नुसती चांगली क्वालिफिकेशन असून चालत नाही तर तेथे कोणतीही समस्या सोडविण्याची क्षमता हीही महत्त्वाची ठरते. यामुळेच मुलाखती देताना उमेदवारांना विचित्र वाटणार्याा पण ट्रीकी प्रश्नांना सामोरे जावे लागते.

कंपनीत सध्या नवीन भरती करताना विविध पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवून दाखविण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे. ७६ लाख ते ९१ लाख वार्षिक वेतन असलेल्या या पदांसाठी प्रश्नही तसेच विचारले जात आहेत. ७६ लाखांच्या पॅकेजसाठी विचारला गेलेला प्रश्न फालतू वाटणार्‍या अंड्याशी संबंधित आहे. यात दोन अंडी आहेत व ती किती मजली इमारतीवरून तुम्ही कशा प्रकारे टाकाल की ती फुटणार नाहीत याचे उत्तर द्यायचे आहे. अर्थात त्यांना नुसते उत्तर नको आहे तर त्यासाठी कोणती प्रोसेस वापरणार याचेही प्रात्यक्षिक द्यावे लागणार आहे. पहा कांही सुचत असेल तर या प्रश्नाचे उत्तर द्या, मग अॅपलची ही नोकरी तुमची समजा.

Leave a Comment