सेक्स टुरिझमच्या माध्यमातून थायलंडमध्ये होते ४० हजार कोटींची उलाढाल


फक्त सेक्स टुरिझमसाठी किंवा वेश्यावृत्तीसाठी जगभरात बदनाम थायलंडमधील एक असे शहर आहे. पटाया असे या शहराचे नाव आहे. एका रिपोर्टनुसार २८ लाखांपेक्षा जास्त वेश्या थायलंडमध्ये असून याच शहरात यामधील बहुतांश वेश्या आहेत. प्रत्येक वर्षी येथे वेश्याव्यवसायाच्या माध्यमातून इकॉनॉमीला ५ बिलियन डॉलर्सचा (जवळपास ४० हजार कोटी) फायदा होतो.

25 वर्षांपासून येथे काम करत असलेल्या व्यक्तीने सांगितले की, सेक्स वर्कर्ससोबतच गुन्हेगारांचाही अड्डा पटाया शहर झाले आहे. येथे जगभरातील विविध क्रिमिनल्सने वास्तव्य केले आहे. याठिकाणी त्यांना पोलीस स्पर्शही करू शकत नाही. कोणतीही कारवाई पोलीस यांच्यावर करत नाही. वेश्याव्यवसायाच्या आडून येथे अनेक बेकायदेशीर धंदे चालतात.

येथील लोकांनी आता पैसे कमावण्याच्या नादात सर्व सीमा ओलांडल्या आहेत. जगभरातून आलेल्या पर्यटकांची कोणतीही मागणी येथे पूर्ण केली जाते. येथे लहान मुलांनाही या वाईट कामामध्ये अडकवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार या कामामध्ये कमीत कमी 40 हजार पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे.

येथे हा गोरख धंदा मसाज पार्लरच्या नावाखाली चालतो. १ हजारपेक्षा जास्त मसाज पार्लर या शहरात आहेत. यावरून संपूर्ण देशात काय परिस्थिती असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

Leave a Comment