तीन सौदी राजपुत्रांसहित 10 जणांचा चकमकीत मृत्यू


सौदी अरेबियात तुरुंगात झालेल्या चकमकीत तीन सौदी राजपुत्रांसहित 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तुरुंगात बंद असलेले राजपुत्र आणि अधिकाऱ्यांना इतरत्र हलविताना ही चकमक झाली. या राजपुत्र व अधिकाऱ्यांना अल हाएर जेलमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यात सशस्त्र धुमश्चक्री झाली आणि त्यात राजपुत्रांबरोबरच तुरुंगाचे 10 कर्मचारीही मारले गेले.

गेल्या शनिवारी वलीद बिन तलाल आणि तुर्की बिन अब्दुल्लाह यांच्यासहित60 राजकुमार आणि अधिकाऱ्यांची रवानगी रियाध येथील या तुरुंगात करण्यात आली होती. ही चकमक झाल्यानंतर अलहाएर जेलकडे जाणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली आहे आणि रियाधमध्ये सुरक्षा दलांच्या विशेष तुकड्या गस्त घालत आहेत, असे इस्ना या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सौदी नरेश सलमान बिन अब्दुल अजीज यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या 11 राजपुत्रांनाही 6 जानेवारी रोजी अटक करून अल हाएर जेलमध्ये टाकण्यात आले होते. सलमान यांनी आर्थिक भ्रष्टाचाराशी लढाई करण्याच्या नावाखाली राजघराण्यातील अनेक महत्त्वाच्या सदस्यांना अटक केली आहे.

Web Title: The death of 10 people, including three Saudi princes