Skip links

उद्या लॉन्च होणार एनफील्डची नवी ‘रॉयल’ बाईक


मुंबई : १२ जानेवारीला भारतात पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड आपले नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. हे रॉयल एनफील्ड हिमालयन Fi बाईकचे २०१८ मॉडेल असेल. सोशल नेटवर्किंगवर या बाईकचे फोटो व्हायरल होत आहेत.

पेंट स्कीम सोबत या बाईकचे अपडेटेड व्हर्जन येणार आहे. रॉयल एनफील्डची हिमालयन Fi ही पहिली ऑफ रोड बाईक आहे. भारतीय बाजारात या किंमतीला रॉयल एनफील्डशिवाय कोणतीही दुसरी कंपनी ऑफ रोड बाईक विकत नाही.

कोणताही बदल हिमालयन Fi या मॉडेलच्या इंजिनामध्ये करण्यात आलेला नाही. ४११ सीसी इंजिन या बाईकमध्ये आधीचच असेल. २४.५ बीएचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्क हे इंजिन जनरेट करेल. बाईकच्या फ्रंट व्हीलमध्ये ३०० एमएम डिस्क ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये २४० एमएम डिस्क ब्रेक असणार आहे. हिमालयन Fi बाईकचं फ्रंट व्हील २१ इंच असेल. तसेच लांब विंडस्क्रीन, जास्त माहिती असणारा इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. रॉयल एनफील्ड हिमालयन Fi बाईकमध्ये एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देऊ शकते. या बाईकची किंमत १.७ लाख रुपये असेल.

Web Title: Enfield's new 'Royal' bike will be launched tomorrow