अमेरिकन पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला जाणे टाळावे, अमेरिकेची नवी सूचनावली


न्यूयॉर्क : भारताची बदनामी अमेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी जारी केलेल्या सूचनावलीमध्ये सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात ज्यांना प्रवास करायचा आहे, जम्मू काश्मीरला जाणे त्यांनी टाळावे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

हिंसाचाराच्या घटना श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर घडू शकतात. परदेशी पर्यटकांना शक्यतो येथे जाण्यापासून भारतीय प्रशासन मज्जाव करते, असे अमेरिकेने म्हटले आहे. विशेषत: जर महिला भारतात जाणार असतील तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घ्यावी. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे अमेरिकेने आपल्या नव्या सूचनावलीत म्हटले आहे.

अमेरिकन पर्यटकांनी जम्मू काश्मीरला (लेह आणि लडाख वगळता) दहशतवादी कारवाया आणि काश्मिरी लोकांचा उद्रेक पाहता भेट देणे टाळावे. भारत-पाक सीमेपासून १० किलोमीटर परिसरात सातत्याने लष्करी कारवाया होत आहेत, तिथून प्रवास टाळावा. मध्य-पूर्व भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दहशतवादी पर्यटनस्थळ, मार्केट-मॉल, स्थानिक प्रशासन सेवा केंद्रांवर हल्ला करु शकतात. महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी.

Leave a Comment