बिग बींचा ‘जलसा’ सोडणार ऐश्वर्या !


ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ‘जलसा’ सोडून लवकरच मुंबईत नव्यानेच घेतलेल्या लक्झरीअस अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सिने जगतात सुरु आहे. ते सध्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासह ‘जलसा’मध्येच राहतात. पण अभिषेक आणि ऐश्वर्या हे खरोखरच अमिताभ यांना सोडून नव्या फ्लॅटमध्ये जाणार का ? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातील संबंध काहीसे खराब आहेत. त्यामुळे हे नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होत असल्याच्याही चर्चा होत आहेत. पण सध्या अभिषेक आपले कुटुंब सोडून कोठेही जाणार नाही. तो त्याच्या आई आणि वडिलांना कधीही सोडू शकत नाही. यापूर्वी, याच कारणामुळे करिश्मासोबत त्याचा साखरपुडा तुटल्याचीही चर्चा झाली आहे. करिश्मा कपूरसोबत नाते तुटण्याचेही, असेच कारण सांगितले जात होते. लग्नानंतर करिश्माची वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहण्याची इच्छा होती. मात्र याला अभि‍षेकचा विरोध होता. अभिषेक आणि ऐश्वर्याने मुंबईमध्ये २१ कोटी रुपयांचा एक लक्झरीअस फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटचे क्षेत्रफळ ५५०० स्क्वेअर फुट एवढे प्रशस्त आहे.