द.कोरियन इलेक्ट्रॅानिक्स जायंट सॅमसंग ने त्यांचा नवा स्मार्टफोन गॅलेक्सी ए ८ प्लस भारतात उपलब्ध करून दिला आहे. हा फोन सध्या फक्त अमेझॉनवर मिळणार असून २० जानेवारीपासून तो ग्राहकांना उपलब्ध होईल. फोनची किंमत ३२९९० रूपये आहे. हा फोन या पूर्वी कंपनीने व्हिएतनामच्या बाजारात लाँच केला गेला आहे.
या फोनसाठी बॅकसाईडला फिंगरप्रिट सेन्सर दिला गेला आहे. ६ इंची फुल एचडी डिस्प्ले, कॉर्निंग ग्लास गोरिल्ला ५ प्रोटेक्शनसह आहे. या स्मार्टफोनसाठी ६ एमपीचा प्रायमरी फ्रंट कॅमेरा, ८ एमपीचा सेकंडरी कॅमेरा शिवाय १६ एमपीचा रियर कॅमेरा विविध अॅपचरसह दिले गेले आहेत. फोनला ६ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज, मायक्रोकार्डच्या सहाय्याने ते २५६ जीबी पर्यंत नेण्याची सुविधा अशी अन्य फिचर्स असून फोनची बॅटरी ३५०० एमएएच ची आहे.