रेल्वे मुळे गायमालक होणार गब्बर


रेल्वेने स्वच्छतेच्या दृष्टीने आखलेली कांही धोरणे व घेतलेले निर्णय गायमालकांना चांगलीच कमाई करून देणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रेल्वेने सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट> बसविण्याचे काम सुरू केले आहे व त्यासाठी गायीच्या शेणापासून बनविला गेलेला द्रवपदार्थ वापरला जात आहे. अंदाजानुसार या कामासाठी रेल्वेला दर वर्षी ४२ कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. पर्यायाने गायमालकांना गाईच्या शेणासाठी चांगला दाम मिळू शकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या बायोटॉयलेट मध्ये वापरण्यासाठी बनविण्यात येणारा द्रव डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट एस्टाब्लीशमेंट ग्वाल्हेर येथे बनविला जातो. रेल्वे तो प्रतिलिटर १९ रूपये दराने खरेदी करते. यासाठी या संस्थेला ३३५० ट्रक गाईचे शेण लागणार आहे. त्याची किंमत अंदाजे ४२ कोटी रूपये आहे. इनोकुलम या नावाने हा द्रव विकला जातो व डिफेन्स संस्था त्यासाठी व्हेंडॉरकडून गायीच्या शेणाची खरेदी करते.

गायीच्या शेणामुळे या द्रवातील बॅक्टेरिया जिवंत राहतातच पण ते अधिक संख्येने वाढतात. ४०० लिटर क्षमतेच्या टँकमध्ये १२० लिटर द्रव मिसळला जातो. यामुळे मलमूत्र वेगळे होते व मलाचा भाग कार्बन डाय ऑक्साईडमध्ये परावर्तित होऊन हवेत उडून जातो. राहिलेले पाणी स्वच्छ करून रेल्वे धुण्यासाठी वापरले जाते.भारतीय रेल्वेने ४४ हजार कोचमध्ये अशी बायोटॉयलेट बसविण्याचा प्रकल्प हाती घेतला असून त्यातील २६ हजार कोचमध्ये अशी टॉयलेट बसविण्याचे काम सुरू झाले आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment