सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी महिलांचे अनोखे अभियान


ग्वालियरमधील महिलांनी सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी एक अभियान सुरू केले असून सॅनिटरी नॅपकिन्सवर केंद्र सरकारने जीएसटी लावण्याबाबत घोषणा केल्यानंतर काही महिलांनी पुढाकार घेऊन त्याला विरोध करण्यासाठी अभियान राबवले आहे. १ हजार सॅनिटरी नॅपकिन्सवर या अभियानाअंतर्गत संदेश लिहून हे नॅपकिन्स पंतप्रधान मोदींना पाठवण्यात येणार आहेत.

सर्वसामान्य महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत ही न परवडणारी आहेत. अनेक गरीब महिला सॅनिटरी नॅपकिन्सचे दर अधिक असल्याने ते विकत घेऊ शकत नाही. त्यातून हे दर जीएसटी लावल्यानंतर आणखी वाढतील त्यामुळे काही महिला त्या खरेदी करू शकत नाहीत असे अनेकांचे म्हणणे आहे. अनेक महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स परवडणारे नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. दरमहा १०० किंवा त्याहून अधिक रुपये गावातील महिला सॅनिटरी नॅपकिन्ससाठी खर्च करू शकत नाही. तेव्हा एकतर त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात यावे किंवा त्यावर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करावा अशी मागणी प्रिती जोशी यांनी केली आहे. या अभियानात त्यांच्याही सहभाग मोठा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही