अनुष्काच्या ‘परी’चा टीझर रिलीज


अभिनेत्री अनुष्का शर्माने लग्न आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर पुन्हा एकदा आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला असून ती काही दिवसांपूर्वीच ‘झिरो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रुजू झाली. त्यानंतर आता तिने आपल्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. अनुष्का लवकरच ‘परी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ती या चित्रपटाच्या निमित्ताने एका भयावह भूमिकेत दिसणार असल्याचे हा टीझर पाहतानाच लक्षात येते. याआधी अनुष्काने ‘फिल्लौरी’ चित्रपटात एका भटकत्या आत्म्याची भूमिका साकारली होती.

Sweet dreams guys…… #HoliWithPari

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अनुष्काने शेअर केलेल्या या टीझरमध्ये एकही संवाद नसला तरीही त्याचे पार्श्वसंगीत आणि समोर दिसणारी अनुष्का प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांचा काहूर माजवून जात आहे. अनुष्काने ‘स्वीट ड्रीम्स…’, असे कॅप्शन देत हा टीझर पोस्ट केला खरा. पण, तो पाहिल्यानंतर अनेकांचीच झोप उडाली असणार यात शंका नाही. ‘क्लीन स्लेट’ आणि ‘क्रिअर्ज एण्टरटेंन्मेन्ट’ची निर्मिती असलेला हा चित्रपट २ मार्चला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.