ए. आर. रहमान सिक्कीमचे सदिच्छा दूत


सिक्कीमच्या सदिच्छा दूत म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी ही ‘सिक्कीम रेड पांडा विंटन कार्निवल’च्या उद्घाटन सोहळ्यात घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी रहमान यांचे हा प्रस्ताव स्वीकारून सिक्कीमसाठी आपला बहुमूल्य वेळ देण्यासाठी आभार मानले.

या सन्मानाबद्दल रहमान यांनीही आनंद व्यक्त केला. ते सिक्कीमच्या दौऱ्यातम्हणाले की, मी येथील संस्कृतीने प्रभावित झालो असून हे राज्य फक्त दिसायलाच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही सुंदर आहे. माझी अशा राज्याचा चेहरा म्हणून निवड केल्याचा मला अभिमान आहे. रहमान यांना यावेळी दीप प्रज्ज्वलनानंतर मुख्यमंत्री चामलिंग यांनी हातमागावर तयार केलेली शाल भेट म्हणून दिली. रहमान यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती राज्यात पर्यटनवाढीला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. रहमान यावेळी पहिल्यांदा सिक्कीमला पोहोचले होते.

Leave a Comment