श्रीमंत पर्यटकांसाठी अंतराळात बनतेय फाईव्ह स्टार हॉटेल


ज्यांना साहसाची खूप आवड आहे आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसाही आहे अशा खास पर्यटकांसाठी आता अनोखे पर्यटनस्थळ लवकरच कार्यरत होत आहे. हे नवे पर्यटनस्थळ चक्क अंतराळात असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर रशिया स्पेस एजन्सी रासकासमॉस आयएसएस एक पंचतारांकित हॉटेल बांधते आहे. या हॉटेलचे काम सुरू झाले आहे. श्रींमत पर्यटक या हॉटेलमध्ये त्यांचा सुटीचा काळ अतिशय आनंदात आणि मजेत घालवू शकणार आहेत.

या हॉटेलमध्ये चार खासगी रूम्स आहेत. प्रत्येक रूममध्ये दोन क्युबिक मीटर जागा असून या रूमखाली आणखी रिकामी जागाही आहे. येथून पर्यटक ४०० मैलांच्या उंचीवरून पृथ्वीचे सुंदर रूपडे न्याहाळू शकतील. प्रत्येक रूमला दीड फुटाची खिडकी व लाऊंज एरिया आहे. तेथे आंतराळ स्थानकावरील वैज्ञानिकांच्या सहाय्याने पर्यटकांना स्पेस वॉक घेता येणार आहे. शिवाय या हॉटेलमध्ये जिम वायफाय या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या हॉटेलच्या उभारणीसाठी ३०० दशलक्ष पौंड खर्च अपेक्षित आहे व सरकार व खासगी संस्थांच्या सहकार्यातून तो केला जाणार आहे.

या हॉटेलमध्ये २४ तासाच्या मुक्कामासाठी १८ कोटी रूपये खर्च येईल. ज्यांना दोन आठवडे राहायचे असेल त्यांना २ अब्ज ५६ कोटी तर ज्यांना १ महिनाभरासाठी मुक्काम टाकायचा असेल त्यांना जादा २० दशलक्ष डॉलर्स भरावे लागणार आहेत.

Leave a Comment