मारूती सुझुकीने त्यांच्या विटारा ब्रिझासह ४ मीटर पेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये टॉप पोझिशन गाठण्यासाठी मायक्रो एसयूव्ही बाजारात आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या नव्या फ्यूचर एसयूव्हीच्या किंमती ४ ते ८ लाखांदरम्यान असतील असे समजते. ही फ्यूचर मायक्रो एसयूव्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नोएडा येथे होत असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जात आहे.
मारूतीची बजेट मायक्रो एसयूव्ही येणार
मारूती उद्योगाने एसयूव्ही सेगमेंटमध्ये त्यातुलनेत उशीरा प्रवेश केला असला तरी आत्ताच त्यांनी बाजारातील १/४ हिस्सा हस्तगत केला आहे. कंपनीचे वरीष्ठ कार्यकारी व्यवस्थापक सी.बी. रमण यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कॉसेप्ट कारचे डिझाईन पूर्णपणे भारतीय डिझायनरनी तयार केले असून त्यासाठी सहा जणांच्या टीमने काम केले आहे. हे डिझाईन करताना भारतीय ग्राहकांच्या आवडी आणि गरजा जाणून घेण्यात आल्या आहेत. मारूतीमध्ये जे डिझाईन केले जाते ते विचारपूर्वकच केले जाते व त्यामुळेच जो प्रॉडक्ट आम्ही बनवितो तो जागतिक दर्जाचा असतो. नव्या मायक्रो एसयूव्हीबाबतही असेच म्हणता येईल.