गौतम अडाणींच्या संपत्तीत अंबानींपेक्षा जलद गतीने वाढ


रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २०१७ मध्ये ७७.५३ टक्के वाढ होऊन ती ४०.३० अब्ज डॉलर्सवर पोहोचली असली तरी २०१७ मध्ये संपत्तीत सर्वाधिक वाढ अडाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अडाणी यांच्या संपत्तीत झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याचाच अर्थ संपत्ती वाढीत अडाणी यांनी अंबानींना मागे टाकले आहे. गौतम अडाणी यांच्या संपत्तीतील वाढ १२४.६ टक्के इतकी असून त्यांची संपत्ती आता १०.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. २०१६ च्या तुलनेत त्यात ४.६३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

अडाणी बंदर व्यवसाय व्यवस्थापन व खाण उद्योग क्षेत्रात आहेत. अडाणी यांच्यानंतर सर्वाधिक संपत्ती वाढ डी मार्टच्या राधाकृष्ण दमाणी यांनी नोंदविली असून त्यांच्या संपत्तीत ३.८८ अब्जांनी वाढ झाली आहे. दमाणी यांची संपत्ती आता ६.९६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून त्यांच्या संपत्तीतील वाढ ८० टक्के असल्याचे समजते.

Leave a Comment