मिठाईच्या शौकिनांसाठी अभूतपूर्व पर्वणी- हैदराबाद येथील वर्ल्ड स्वीट फेस्टिव्हल


ज्यांना मिठाई खाण्याचा शौक आहे, त्यांन लवकरच नाना तऱ्हेच्या जगभरातील मिठायांचा आस्वाद घेण्याची पर्वणी लाभणार आहे. हैदेराबाद येथे १३ जानेवारी पासून वर्ल्ड स्वीट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हल मध्ये भारतातील २५ वेगवेगळ्या राज्यांची खासियत असणाऱ्या मिठाया चाखायला मिळणार आहेतच त्याशिवाय पंधरा निरनिराळ्या देशांमधील मिठाया देखील या फेस्टिव्हल मध्ये चाखण्याची संधी मिठाई-शौकिनांना मिळणार आहे. मिठाईच्या देशी-विदेशी अशा सर्व तऱ्हा मिळून सुमारे एक हजार प्रकारच्या निरनिराळ्या मिठाया या फेस्टिव्हल मध्ये पाहण्यास व चाखण्यास मिळणार आहेत. हा फेस्टिव्हल तेलंगाना शासनाच्या वतीने आयोजित केला जात आहे.

हैदराबाद शहर हे देशी विदेशी खाद्य-परंपरांचे संगम असणारे शहर आहे. या शहराची हीच खासियत दर्शविण्यासाठी ह्या फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे अशी माहिती पर्यटन विभागातर्फे देण्यात आली. तीन दिवस चालणारा हा महोत्सव निरनिराळ्या सांस्कृतिक, भाषिक संघटनांच्या मदतीने आयोजित करण्यात आला आहे. तसेच भारताबाहेरून आलेल्या, पण आता हैदेराबादमधेच कायमस्वरूपी वास्तव्य करून असणाऱ्या विदेशी नागरिकांचे देखील या महोत्सवामध्ये सहकार्य लाभले असल्याचे समजते.

या महोत्सवामध्ये असणाऱ्या मिठायांचे वर्गीकरण राज्यांप्रमाणे केले जाणार नसून, मिठायांच्या पद्धतींप्रमाणे केले जाणार आहे. एका पद्धतीच्या मिठाया एका स्टॉल मध्ये असणार आहेत. म्हणजे खीर ही मिठाई बहुतेक राज्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारे बनविली जाते. त्यामुळे दर राज्यामध्ये बनविला जाणारा खिरीचा प्रकार त्या त्या राज्याच्या स्टॉल मध्ये न ठेवता, खिरीच्या सर्व प्रकारांसाठी एकाच स्टॉल असणार आहे. अश्या प्रकारे खिरीचा आस्वाद घेणाऱ्याला एकाच ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या खिरी चाखण्यास मिळणार आहेत. या महोत्सवातील काही मिठाया तयार करून आणल्या जाणार आहेत, तर काही मिठायांचे ‘ लाईव्ह काऊंटर ‘ असणार आहेत, म्हणजेच त्या मिठाई स्टॉल्समध्येच तयार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment