याला म्हणतात आयजीच्या जीवावर बायजी उधार!


मॅनहॅटन : आजही अनेकजण आपले नशीब आजमावण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी करतात. पण यात काहींचे नशीब उघडते तर काही निराश होतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. येथे एका दुस-या व्यक्तीच्या चुकीने एक महिला एका रात्रीत झाली आहे.

अमेरिकेतील न्यूजर्सीच्या मॅनहॅटनमधील ही घटना असून येथे नशीब आजमवाण्यासाठी एका सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेल्या ओक्साना जहारोव(४६) या महिलेने एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. लॉटरीच्या तिकीटाची किंमत १ डॉलर होती. पण या महिलेला स्टोरमध्ये बसलेल्या व्यक्तीने चुकीने १ डॉलरच्या तिकीटाऎवजी १० डॉलरची लॉटरी तिकीट दिली.

ओक्साना यांनी सांगितले की, चुकीचे लॉटरी तिकीट मिळाल्यानंतरही ते तिकीट घेण्याचा निर्णय मी घेतला. पण लगेच ते तिकीट स्क्रॅच केले नाही. ते तिकीट मी बुकमार्क म्हणून वापरत होते. ओक्सानानुसार, हे लॉटरीचे तिकीट जेव्हा मी स्क्रॅच केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. ५ मिलियन डॉलर(३१ कोटी ६६ लाख रूपये)चे बक्षीस लॉटरीवर होते. आत्तापर्यंत कधीच मी काहीच जिंकले नाही. त्यामुळे माझा यावर विश्वास बसला नाही. नंतर मी ते लॉटरी तिकीट सुपरमार्केटमध्ये घेऊन गेली. तेव्हा मला विश्वास बसला की, मला लॉटरी लागली आहे. मी आता ५ मिलियन डॉलरची मालकीण आहे.

ओक्सानाला ही लॉटरी जिंकल्यानंतर १९ वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी २६०,००० डॉलर(१ कोटी ६४ लाख रूपये) मिळणार आहे. यासोबतच तिला अ‍ॅडिशनल पेमेंट रूपात ६० हजार डॉलर(३८ लाख रूपये) मिळतील. या पैशातून ओक्सानाला परिवारासोबत एका देशांची सैर करायची असून त्याचबरोबर या पैशातून तिला मुलांच्या शिक्षणासाठीही काहीतरी करायचे आहे.

Leave a Comment