झुरका मारण्यात उत्तर प्रदेशमधील महिला टॉपवर


लखनौ – उत्तर प्रदेशमधील तरुणी आणि महिलांवर चमकत्या आधुनिक जीवनशैलीचा वाईट प्रभाव पाडत असून आवड म्हणून सुरू झालेली धूम्रपानाची सवय आता या महिला आणि तरुणींचे व्यसन बनत आहे. ग्लोबल एडल्ट टोबॅकोने १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे सर्वेक्षण केले. या गोष्टीचा खुलासा यामध्ये झाला असून उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ६ वी महिला धूम्रपान करत आहे.

ग्लोबल एडल्ट टोबॅको सर्वे (गेट्स) २०१६-१७ ची फॅक्ट शीट लखनौमध्ये मागील काही दिवसात सादर करण्यात आली. जे आकडे या अहवालात देण्यात आले होते. तरुणी आणि महिलांना लागलेले हे धुम्रपानाचे व्यसन कसे सोडविता येईल यावर विचार करण्यास या अहवालाने भाग पाडले आहे.

या अहवालाची विस्ताराने माहिती देताना मुंबईहून आलेल्या कंसल्टेंट सुलभा परशुरामन यांनी सांगितले, की १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना गेट्स-२ सर्वेमध्ये सहभागी करुन घेण्यात आले होते. केंद्रीय परिवार कल्याण विभाग, डब्लूएचओ व टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईद्वारा मल्टी स्टेज सँपलचे डिजाईन तयार करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातून ७४,०३७ लोकांचे आणि यूपीतून १,६८५ पुरुष व १,७७९ महिलांना सहभागी करण्यात आले होते.

परशुरामन यांचा अहवाल आपण मानला तर असे दिसून येते, की सध्या उत्तर प्रदेशमध्ये वर्ष २००९-१० मध्ये झालेल्या सर्वेपेक्षा धूम्रपान करणा-यांची संख्या वाढलेली दिसून येते. तंबाकूजन्य उत्पादनांचा उपयोग करणाऱ्या पुरुषांची सरासरी संख्या यामध्ये ५२ टक्के आहे. तेच प्रमाण महिलांमध्ये १७.७ टक्के इतके आहे.

तंबाकू अथवा तिचे कोणात्यातरी स्वरूपाचे सेवन अहवालानुसार प्रत्येक ६ वी महिला करत आहे. गुटखा, खैनी, बीडीचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये मजूर महिलांची संख्या जास्त असून सुरुवातीला शौक म्हणून सुरु केलेली ही सवय आता त्यांचे न सुटणारे व्यसन बनत चालल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.

तंबाखु उत्पादनाच्या प्रचाराची सरासरी वर्ष २००९-१० मध्ये १०.३ होती, आता ती वाढून १६.३ झाली आहे. उत्तर प्रदेश तंबाकू उत्पादनांचे सेवन करण्यात १२ व्या क्रमांकावर आहे. एकुण सरासरीचा विचार केला तर त्रिपुरामधील ६४.५ टक्के लोक तंबाकू उत्पादनांचे सेवन करत आहेत. मिझोरममध्ये ५८.७ टक्के लोक याचे सेवन करत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment