काय सांगतात चेकबुकवरील आकडे?


आपण बँकेचे चेकबुक नेहमीच वापरतो. त्यावर अनेक प्रकारचा मजकूर असतो तसेच तळभागात काही आकडे विशिष्ठ पद्धतीने लिहिलेले असतात. हे आकडे म्हणजे नुसते नंबर नसतात तर ते अनेक प्रकारच्या माहितीचे द्योतक असतात. चेकबुकच्या तळाशी असे २३ आकडे असतात.त्याचा काय अर्थ असतो याची माहिती आपण करून घेणे आवश्यक आहे. चेकबुकवर या व्यतिरिक्त अकौंट नंबर, ग्राहकाचे नाव व तारीख असाही तपशील असतो.

चेकबुकच्या तळातील २३ आकडे चार विभागात विभागलेले दिसतात. पहिल्या भागात ६, दुसर्‍या भागात ९, तिसर्‍या भागात ६ व चौथ्या भागात दोन अशी त्यांची विभागणी असते. नवीन इलेक्ट्राॅनिक चेकबुकमध्ये तिसर्‍या भागात पुढचे सहा आकडे दिसतात. जुन्या चेकबुकात ते नाहीत.

या आकड्यांतील चौथा भाग ट्रान्झॅक्शन आयडी असतो. शेवटचे २९.३०,३१ नंबर एट पार तर ०९,१० व ११ हे आकडे चेक लोकल असल्याचे दाखवितात. याशिवाय एमआयआरसी कोडही असतो. दुसर्‍या भागात ९ डिजिट असतात त्यावरूच चेक कोणत्या बँकेतून जारी केला गेला हे चेक रिडींग मशीनच्या सहाय्याने ओळखता येते. या आकडा तीन विभागात विभागलेला दिसतो. त्यातील पहिला सिटी कोड असतो त्यावरून शहराचे नांव समजते. दुसरा बँक कोड असतो व प्रत्येक बँकेसाठी तो वेगळा असतो. हा नंबर युनिक असतो. तिसरा हिस्सा ब्रँच कोड असतो. बँकेशी संबंधित सर्व व्यवहारामध्ये याचा वापर केला जात असतो. म्हणजे एक चेक तुमचे नांव, अकौंट नंबर याचबरोबरच शहर, बँक व बँक शाखा यांचीही माहिती पुरवितो.

Leave a Comment