अमेरिका : फेसबुकवरील ग्राहकांचा वापर अधिक सहज व्हावा याकरिता यामध्ये अपडेट्स दिले जात असून इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये आता फेसबुक नवा अपडेट आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
आता थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवर इंस्टाग्राम स्टोरीज
आजकाल ‘स्टोरीज’ हा नवा आणि इंटरेसटिंग प्रकार खूपच चर्चेमध्ये आहे. हा पर्याय व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये आहे. पण यांना आता एकमेकांशी लिंक करण्याचा प्रयत्न फेसबुक करणार आहे. त्यामुळे इंस्टाग्रामची स्टोरी आता थेट व्हॉट्सअॅपवरही स्टेट्समध्ये दिसण्यास शक्य होणार आहे.
याबाबत फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार ‘इंस्टाग्राम स्टोरीज’ आणि ‘ व्हॉट्स अॅप स्टेट्सचा वापर सुमारे ३० कोटी युजर्स करतात. ग्राहकांना स्नॅपचॅटप्रमाणे सुविधा देण्यासाठी फेसबुकने इंस्टाग्रामचा पर्याय आणला. यामध्ये सतत नवनवे अपडेट्स देण्यात आले आहेत. सध्या स्नॅपचॅट युजर्सची संख्या १७.३ कोटी आहे.
फेसबुकचा १२ वर्षाहून लहान असणार्या युजर्समध्ये वापर अधिक सुकर बनवण्यासाठी पॅरेंटॅल कंट्रोलचा ऑप्शन देण्यात आला आहे. फेसबुक मेसेंजर अॅपवरील नियंत्रण यानुसार पालकांकडे राहणार आहे. ६-१२ वयातील मुलांसाठी नवे अॅप बनवण्यात आले आहे. पालक मुलांची कॉन्टॅक्ट लिस्ट कंट्रोल करू शकणार आहेत.