जिओने स्वस्त केले आपले प्लान


मुंबई : टेलिकॉम क्षेत्रातील चुरस रिलायंस जिओच्या आगमनानंतर अधिकच वाढली असून या क्षेत्रातील आपले अस्तित्त्व आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांनी नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत.

जिओने सुरूवातीला ‘हॅपी न्यू इयर’ प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन १ जीबी डाटा प्लान आणला होता. जिओ ग्राह्कांना आता अजून दोन ऑफरचा लाभ घेता येणार आहे. प्रतिदिन १ जीबी डाटा या प्लानची किंमत आता ६० रूपयांवरून ५० रूपये करण्यात आली आहे. १९९ ऐवजी आता २८जीबी डाटा चा प्लान १४९ रूपयात मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी आता २८ दिवसांची आहे. ७०जीबी डाटा प्लानदेखील आता ३९९ ऐवजी ३४९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी ७० दिवसांची आहे.

आता ग्राहकांना जिओ ५० % अधिक डाटा उपलब्ध करून देणार आहे. तुमच्या प्रत्येक दिवसाच्या डेटा प्लानची लिमिट यामध्ये वाढवण्यात आली आहे. ग्राहकांना पूर्वी मिळत असलेल्या १ जीबी डाटा आता या प्लानमुळे ५० % अधिक डाटा मिळणार आहे. आता नव्या प्लाननुसार ग्राहकांना १.५ जीबी डाटा मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या नव्या प्लानचा फायदा ग्राहकांना ९ जानेवारीपासून घेता येणार आहे.

Leave a Comment