फक्त एका दिवसात ७ हजार ५०० कोटी शुभेच्छांचे मेसेज व्हॉट्स अॅप या प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून पाठवले गेले असून एवढ्या प्रचंड संख्येने एका मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून मेसेज पाठवण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे सर्वाधिक मेसेज एकाच दिवशी पाठण्याचा विक्रम व्हॉट्स अॅपने आपल्या नावे केला आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी व्हॉट्सअॅपचा अनोखा विक्रम
विशेष म्हणजे व्हॉट्स अॅप नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काही काळासाठी बंद पडले होते. पण, तरीदेखील या अॅपच्या माध्यमातून जगभरातून सर्वाधिक शुभेच्छांचे मेसेज आणि फोटो पाठवले गेले. त्याचबरोबर एकट्या भारतातून ७ हजार ५०० कोटी शुभेच्छांचे सर्वाधिक मेसेज पाठवले गेले. कारण व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची भारतातील संख्याही सर्वाधिक आहे. टेक्स मेसेज सेवेसाठी पैसे मोजावे लागत असल्याने अनेकांनी व्हॉट्स अॅपचा वापर करायला सुरूवात केली. व्हॉट्स अॅपवरून गेल्यावर्षी नववर्षांच्या पहिल्या दिवशी ६ हजार ३०० कोटी मेसेज पाठवले गेले होते.