या सेलिब्रिटीजनी चिरतरुण राहण्यासाठी घेतला हेअर ट्रान्सप्लांटचा आधार


बॉलीवूड मधील आपले आवडते स्टार्स नेहमीच तरुण दिसतात. चित्रपट असो, किंवा एखादा पारितोषिक वितरण सोहोळा, आपले आवडते सुपरस्टार्स नेहमीच परफेक्ट दिसतात. पण काळ कोणासाठीही थांबत नसतो, तसाच या स्टार्स साठी देखील थांबत नाही. सरत्या काळाबरोबर उद्भविणाऱ्या वाढत्या वयाच्या खुणा या स्टार्सच्या चेहऱ्यांवर देखील उमटत आहेत. तरुण दिसण्यासाठी आजकाल स्टार्स निरनिराळ्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेत असतात. याविषयीची चर्चा निरनिराळ्या मासिकांतून, वर्तमानपत्रांतून वाचायला मिळत असते.

वय वाढत असले, तरी बॉलीवूड स्टार्स ना पडद्यावर आणि बाहेरही चांगलेच दिसावे लागते. वाढत्या वयाची सर्वात पहिली खूण म्हणजे डोक्यावरील केस कमी होणे. ही वाढत्या वयाची खूण लपविण्यासाठी काही स्टार्सनी हेअर ट्रान्सप्लांट करवून घेतले आहे. बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचे केस १९९०च्या दशकात कमी होऊ लागले होते. त्या काळी त्यांची बॉलीवूड मधील कारकीर्द देखील काहीशी डळमळीत झाली होती. त्या वेळी अमिताभ यांनी हेअर ट्रान्सप्लांट करविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००० साली अमिताभचे नवे रूप त्यांच्या दर्शकांच्या समोर आले. त्यांच्या अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘ कौन बनेगा करोडपती ‘ या मालिकेद्वारे अमिताभ छोट्या पडद्यावरून दर्शकांच्या घराघरामध्ये, आणि प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. हा शो किती सुपरहिट झाला हे आपल्याला सर्वांनाच चांगले ठाऊक आहे.

डान्स आणि कॉमेडी या दोन्ही माध्यमांमध्ये महारथी असलेला अभिनेता गोविंदा १९८०-९० च्या दशकांमध्ये सुपरहिट कलाकार म्हणून ओळखला जात असे. गोविंदा ने देखील त्याचे डोक्यावरचे केस कमी होऊ लागले आहेत हे पाहताच त्वरित हेअर ट्रान्सप्लांट करून घेण्याचा निर्णय घेतला. अलीकडच्या काळामध्ये ‘ टॉयलेट – एक प्रेमकथा ‘, ‘ स्पेशल २६ ‘,आणि लवकरच प्रदर्शित होत असणारा ‘ पॅड मॅन ‘ यांच्यासारखे हटके, हिट चित्रपट देणारा अक्षय ‘ खिलाडी ‘ कुमार याने देखील हेअर वीव्हिंग करवून घेतले आहे.

बॉलीवूडचा ‘ सुलतान ‘ सलमान याने करविलेले हेअर ट्रान्सप्लांट तर बहुचर्चित ठरले. त्याचप्रमाणे अभिनेता अक्षय खन्ना याने करविलेल्या हेअर ट्रान्सप्लांटची चर्चा अनेक मासिकांमधून रंगली होती. अभिनेता संजय दत्त याने देखील हेअर ट्रान्सप्लांट करविले आहे. ११९० च्या दशकातले सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांनी दुबई येथे जाऊन हेअर ट्रान्सप्लांट करवून घेतले आहे. त्याचप्रमाणे आपल्या गायकीच्या जरा हटके ढंगासाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया याच्या टोपीवाल्या लुक नंतर त्याचा हेअर ट्रान्सप्लांट वाला लुक देखील चर्चेचा विषय ठरला होता. प्रसिध्द कॉमीडीयन कपिल शर्मा याने देखील हेअर ट्रान्सप्लांट करविले आहे.