इन्फोसिस सीईओंना मिळणार घसघशीत वार्षिक वेतन


बंगळुरू – २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आघाडीची सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी इन्फोसिसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सलिल परिख यांना १६ कोटी २५ लाख रुपयांचे घसघशीत वेतन मिळणार आहे. तसेच परिख यांना वर्षाच्या शेवटी अन्य काही आर्थिक लाभ मिळतील. परिख यांचा कार्यकाळ २ जानेवारी २०१८ ते १ जानेवारी २०२३ हा असेल.

याविषयीची अधिकृत माहिती इन्फोसिसच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्यांनी दिली. पारिख यांना मिळणाऱ्या वेतनापैकी वार्षिक ६ कोटी ५० लाख रुपये स्थिर वेतनाचा तर ९ कोटी ७५ लाख रुपयांच्या अस्थिर वेतनचा समावेश आहे. तसेच पारिख यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी ३ कोटी २५ लाख रुपये स्टॉक युनिट म्हणून तर १३ कोटी रुपये अॅन्युएल परफॉर्मन्स इक्विटी ग्रँट म्हणून मिळतील.

Leave a Comment