बिना कार्ड, बिना पिन काम करणारे एटीएम


खासगी क्षेत्रातील येस बँकेने असे एटीएम वापरात आणले आहे ज्यासाठी ग्राहकाला डेबिट कार्ड अथवा पिन नंबरची आवश्यकता राहणार नाही.यासाठी बँकेने फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप नियरबाय टेक्नॉलॉजीबरोबर करार केला आहे. त्यानुसार बँकेला आधार आधारित एटीएम उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याच्या माध्यमातून ग्राहक रिटेलर्स कडे पैसे जमा करणे, पैसे काढणे अशी सेवा घेऊ शकणार आहे.

स्मार्टफोनचा वापर करून कुणीही रिटेलर- ग्राहक आधार एटीएम, आधार बँक शाखा स्वरूपात वापरू शकणार आहे. त्यासाठी येस बँकेने नॅशनल पेमेंट कार्पोरेशनसह काम केले असून देशभरात ४० हजार टच पॉईंट दिले जाणार आहेत. या टच पॉईटवरून ग्राहक आधार नंबर व बोटांचे ठसे देऊन रोख काढणे, भरणे वा अन्य आर्थिक देवघेवीचे व्यवहार करू शकतील असे समजते. यासाठी रिटेलर्स ऑफ इंडिया बरोबरही बँकेने करार केला आहे.

Leave a Comment