जगभरात असेही आकारले जातात कर


सौदी व यूएईने त्यांच्या देशात नुकताच वॅट जारी केला आहे. मात्र जगभरातील अनेक देशांत किती तरी विचित्र प्रकारांनी कर आकारले जात आहेत. त्यात अगदी सूर्यप्रकाशापासून ते खाण्याच्या चॉप स्टिक्सपर्यंत अनेक गोष्टींवर लोकांना कर द्यावे लागत आहेत.

ग्रीसदेशात घरात खासगी स्विमिंग पूल असेल तर मालकाला वर्षाला ८०० युरो कर भरावा लागतो. त्यामुळे येथे चोरून मारून घरात पूल बांधण्याचे प्रमाण मोठे आहे. हंगेरीत १ सप्टेंबर २०११ पासून पॅक्ड फूड, कोल्ड ड्रींक्सवर कर लावला जातो. त्यात एनर्जी ड्रिंकचाही समावेश आहे. आपल्या देशातील नागरिकांनी हेल्दी फूड खावे यासाठी हा कर लावला गेला आहे. त्याला चिप्सोवी टॅक्स अ्रसे नांव आहे. तर स्पेनमधील बॅलेयरिक बेटावर पर्यटनासाठी येणार्‍यांकडून सूर्यप्रकाशावर कर वसूल केला जातो. पर्यटकांना रोज १ युरो कर भरावा लागतो.या बेटांवर रिसॉर्ट मध्ये राहणार्‍या पर्यटकांना हा कर द्यावा लागतो. त्यातून समुद्र किनार्‍यांची स्वच्छता व देखभाल केली जाते.


चीनमध्ये डिस्पोजेबल चॉपस्टीकवर स्पेशल टॅक्स लावला गेला आहे. येथे दरवर्षी ४५ अब्ज चॉपस्टीक्स फेकून दिल्या जातात. या चॉपस्टीकसाठी २५ दशलक्ष झाडे वापरली गेलेली असतात. त्यामुळे लोकांनी परतपरत वापरता येणार्‍या प्र्लस्टीकच्या चॉपस्टीक्स वापराव्या यासाठी डिस्पोजेबल लाकडी चॉपस्टीक्सवर कर लावला गेला आहे. ऑस्ट्रीया हा देश आल्प्स स्कीईंग व स्नोबोर्डसाठी उत्तम मानला जातो. दरवर्षी दीड लाख स्कियर्स येथे अपघाताची शिकार होतात. त्यांना बरेचदा प्लॅस्टर घालावे लागते. या देशाने जिप्सम प्लॅस्टर कर नावाने कर लागू केला असून ज्या पर्यटकांना फ्रॅक्चर होते त्यांना हा कर द्यावा लागतो. हॉटेल्स, रिजॉर्ट मालक हा कर गोळा करतात.


व्हेनिसमध्ये १९९३ पासून रेस्टॉरंट, दुकाने व प्रॉपर्टीवर शेड केली तर कर आकारला जात आहे. सिटी अॅथॉरिटीने हा कर लागू केला आहे त्यामुळे अनेकांनी अशा उभारलेल्या शेडस काढून टाकल्या आहेत. बेल्जियम मध्ये २००७ सालापासून वुलेनिया स्थानिक सरकारने ग्रीलवर खाद्यपदार्थ तयार केले तर कर लावला आहे. ग्लोबल वॉर्मिंग विरोधात जगभराता प्रयत्न सुरू आहेत. हा कर त्याचाच एक भाग आहे. ग्रिल वापरामुळे तापमान अधिक वाढते व अपायकारक वायू जास्त प्रमाणात निर्माण होतात म्हणून त्यावर कर आकारला जात असल्याचे समजते. विशेष म्हणजे सरकार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने थर्मल इमेजिंग कॅमेर्‍यांतून ग्रीलवर कुठे खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत का यावर लक्ष ठेवते.
——–

Leave a Comment