बाहुबलीपेक्षा भारी आहे हा मुक्काबाज


एखाद्या सामान्य अभिनेत्याला हे आव्हान दिले जाते कि जेव्हा वास्तविक बॉक्सर बनशील तेव्हाच तुझ्यासोबत चित्रपट बनवला जाईल आणि ते देखील फक्त २ वर्षांत करणे सोपे नाही, परंतु हे संभवनीय दिसत नाही. होय, ‘ब्लॅक फ्राइडे’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणा-या अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात एकही नायक नाही. परंतु असा एक हिरो आहे ज्याने कमी बजेट आणि लघुपटामध्ये काम केले आहे. विनीत सिंग नावाच्या अभिनेत्याने ही कमाल करून दाखवली आहे. जी याआधी आमीर खान आणि बाहुबली प्रभासने देखील केले नसेल. बॉक्सर बनल्यानंतर विनीतने प्रत्यक्षात चित्रपट साईन केला.

इरॉस नाऊने युट्युबवर नुकताच ‘द स्पिरिट ऑफ मुक्केबाज’ हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये असे दाखविले आहे कि विनीतने आपल्या सडपातळ बांध्याला एखाद्या बॉडी बिल्डरसारखे कसे बनवले. दिग्दर्शक अनुराग यांच्या अटींनुसार विनीतने बॉक्सरसोबत राहून त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

प्रशिक्षण दरम्यान त्याने कुठकुठल्या प्रसंगांना तोंड दिले आणि विनीतने केवळ व्यावसायिक बॉक्सिंग प्रशिक्षिण घेतले नाहीतर आपली ट्रेन्ड बॉडीही तयार केली. बॉक्सर्स आणि प्रशिक्षकांसोबत सलग दोन वर्षे राहून बॉक्सिंगचे छोटे मोठे गुण जाणून घेतले.