यंदाचे पहिले चंद्रग्रहण खास- १५० वर्षांनंतर आला हा योग


यंदा ३१ जानेवारीला होत असलेले वर्षातले पहिले खग्रास चंद्रगहण विशेष महत्त्वाचे आहे कारण ब्ल्यू मून म्हणजे पृथ्वी सूर्याच्या जवळ व पृथ्वी व च्रंद यातील अंतर अगदी कमी असताना हे चंद्रग्रहण होत आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी असते त्या पौर्णिमेला सुपरमून किंवा ब्ल्यू मून म्हटले जाते. हा योग यंदा १५० वर्षांनंतर आला असून या पूर्वी हा योग ३१ मार्च १८६६ ला आला होता. ३१ जानेवारीला होत असलेले हे ग्रहण ७७ मिनिटांचे आहे. अर्थात भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार नाही.

वॉशिंग्टमधून मध्यरात्रीपासून हे ग्रहण दिसू शकणार आहे त्याचबरोबर मध्यपूर्व आशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाच्या कांही भागात ते सायंकाळी पाहता येणार आहे. अलास्का, हवाई बेटे, कॅनडाचा कांही भाग येथे खग्रास ग्रहण दिसेल. यानंतर असा योग ३१ डिसेंबर २०२८, ३१ जानेवारी २०३७ मध्ये येईल. यावेळीही खग्रास ग्रहण दिसणार आहे. यापूर्वी सुपरमून असताना ३१ डिसेंबर २००९ रोजीही चंद्रग्रहण झाले होते मात्र ते खंडग्रास होते. जगभरातील संशोधक ३१ जानेवारीच्या ग्रहणाकडे नजर लावून बसले असून यावेळी चंद्रात होत असलेले परिवर्तन व पृथ्वीवरील हवामान बदल यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत.

Leave a Comment