एलजीचे सिग्नेचर सिरीज मधील स्मार्टफोन भारतात


दक्षिण कोरियाच्या इलेक्ट्राॅनिक्स कंपनीने म्हणजे एलजीने भारतात त्यांची नवी सिग्नेचर स्मार्टफोन सिरीज लिमिटेड एडिशन ५ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या कार्यक्रमात लाँच केली जात असल्याची घोषणा केली असून ही सिरीयल कोरियात डिसेंबर २०१७ मध्ये लाँच केली गेली आहे.

हे स्मार्टफोन लिमिटेड एडिशनचे आहेत व स्क्रॅचप्रूफ असलेल्या या फोनवर भारतीय ग्राहक त्यांचे नांव फोनच्या मागच्या बाजूस कोरून घेऊ शकणार आहेत. सध्या काळ्या वा पांढर्‍या रंगात हे फोन उपलब्ध केले जात आहेत. दक्षिण कोरियात हे फोन १,१८,८०० रूपयांत उपलब्ध आहेत. भारतात ते साधारण सव्वा लाख रूपयांपर्यंत मिळतील असे समजते.

या फोनसाठी ६ इंची ओलेड डिस्प्ले, ६ जीबी रॅम,२५६ जीबी स्टोरेज, वाईड अँगल लेन्ससह ड्यूल रियर कॅमेरा, अँड्राईड ओरियो ८.० ओएस, वायरलेस चार्जिंगची सुविधा असलेली ३३०० एमएएचची बॅटरी अशी फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment