इसरो नव्या वर्षात एकाचवेळी करणार ३१ उपग्रह प्रक्षेपित


येत्या १० जानेवारीला इसरो श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून या वर्षातील पहिले प्रक्षेपण करणार आहे. यात पृथ्वी परिक्षणासाठी पाठविल्या जाणार्‍या कार्टोसेट सह ३१ उपग्रह एकाचवेळी आकाशात सोडले जाणार आहेत. इसरोचे प्रमुख देवीप्रसाद कर्णिक यांनी सांगितले की १० जानेवारीला सकाळी साडेनऊची वेळ त्यासाठी आत्ता ठरविली गेली
असून या ३१ उपग्रहात अमेरिकेचे २८ तर अन्य देशांचे पाच उपग्रह आहेत.२०१८ सालातले हे पहिले मिशन आहे.

यापूर्वी ऑगस्टमध्ये याचप्रकारे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भारताचा आठवा नौवहन उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.१० तारखेला कार्टोसेटचा सहावा उपग्रह व अन्य रॉकेटच्या सहाय्याने सोडले जातील. हा उपग्रह शहरी तसेच ग्रामीण नियंत्रण, तटीय क्षेत्र, रस्ते देखभाल या संदर्भात महत्त्वाचा डेटा पुरवू शकणार आहे. इसरो चांद्रयान दोनची तयारीही जोरात करत असल्याचे कर्णिक यांनी सांगितले.

Leave a Comment