यावर्षी आलेले ‘लॉन्ग वीकेंड्स‘


नवीन वर्षांच्या दिनदर्शिका हातामध्ये पडताच आपण या वर्षातील सणवार आणि सुट्ट्या पाहिल्या असतील. या वर्षी काही सुट्ट्यांच्या बरोबर शनिवार-रविवारची सुट्टी घेऊन आल्या असल्याने या वर्षभरामध्ये पुष्कळ ‘ लॉन्ग वीकेंड्स ‘ चा आंनद आपल्याला घेता येणार आहे. त्यामुळे या सुट्ट्या विचारात घेऊन तुम्हाला आतापासूनच आपल्या व्हेकेशन प्लॅन करायला हरकत नाही.

२०१८ या वर्षाची सुरुवातच मुली लॉन्ग वीकेंडने झाली. त्यामुळे शनिवार-रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नववर्षाचे स्वागत आणखीनच आनंदात झाले. जशी या वर्षाची सुरुवात झाली, तश्याच प्रकारे शनिवार-रविवारला जोडून अनेक सुट्ट्या या वर्षभरामध्ये पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या वर्षी गणतंत्र दिवस, म्हणजेच २६ जानेवारीची सुट्टी शुक्रवारी येत आहे, व त्याला जोडून शनिवार-रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्याचप्रमाणे होळीचा सण देखील २ मार्च रोजी, म्हणजेच शुक्रवारी येत आहे. त्या सुट्टीला ही दोन दिवसांच्या सुट्ट्यांची जोड मिळणार आहे. यंदाच्या वर्षी महावीर जयंती २९ मार्च रोजी येत असून त्या दिवशी गुरुवार आहे, व शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने त्या दिवशी ही सुट्टी असणार आहे. या दोन सुट्ट्यांना जोडून शनिवार-रविवार या आणखी दोन सुट्ट्या आल्या आहेत.

१५ जून रोजी रमजान ईदची पूर्वसंध्या आहे, व हा दिवस ही शुक्रवार आहे. रक्षाबंधन मात्र या वेळी रविवारी येत असल्याने ती सुट्टी कमी होणार आहे. या वर्षी जन्माष्टमीचा सण ३ सप्टेंबर रोजी येत आहे. त्यादिवशी सोमवार आहे. त्यामुळे शनिवार-रविवारला जोडून ही सोमवारची सुट्टी आली आहे. यंदाच्या वर्षी दसऱ्याचा सण १९ ऑक्टोबर रोजी, म्हणजेच शुक्रवारी आला आहे. त्यामुळे त्याला जोडून पुढे दोन दिवसांची सुट्टी घेता येणार आहे. गुरु नानक जयंतीचे पर्व २३ नोव्हेंबर रोज असून, त्या दिवशी शुक्रवार येत आहे, त्यामुळे या सुट्टीला जोडून शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.

Leave a Comment