तब्बल ३६००० रुपयांनी स्वस्त झाला गुगल पिक्सेल XL


मुंबई : गुगलने आपल्या पिक्सेल XL या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली असून या फोनची अमेझॉनवर किंमत ७६ हजारांहून ३९ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ असा कि या फोनची किंमत ३६ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. दरम्यान गुगल पिक्सेल 2XL या स्मार्टफोनच्या किंमतीतही कपात करण्यात आली असून फ्लिपकार्टवर हा फोन ४९ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे.

गुगल पिक्सेल २ च्या ६४जीबी व्हेरिएंटची किंमत ६१ हजार रुपये, तर १२८जीबी व्हेरिएंटची किंमत ७० हजार रुपये आहे. जुन्या पिक्सेल फोनप्रमाणेच पिक्सेल २ मध्ये 5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर पिक्सेल २ XL मध्ये ६ इंच आकाराचा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये हे फोन उपलब्ध असतील. हे फोन तुम्हाला ६४जीबी आणि १२८जीबी व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येतील. स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर आणि ४जीबी रॅम या दोन्ही फोनमध्ये देण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये १२.२ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment