मार्च २०१८ पासून जपानमध्ये धावणार फोल्डींग कार


जपानमधील प्रसिद्ध अॅनिमेशन आर्टिस्ट कुनिओ ओकाबारा यांनी पहिली फोल्डींग कार तयार केली असून अर्थ वन असे तिचे नामकरण केले गेले आहे. या कारमुळे कार पार्कची समस्या बर्‍याच अंशी कमी होईल असा दावाही केला जात आहे. ही कार रस्त्यात चालतानाच शेप बदलू शकते.

टोक्यो येथील कार डिझाईन कंपनी फोर लिंक सिस्टीमने ही कार मार्च २०१८ मध्ये जपानी रस्त्यावर उतरेल असे जाहीर केले आहे. त्यांनी सध्या वर्षाला ३०० कार्स विक्रीचे ध्येय ठेवले आहे. या कारचा वापर एअरपोर्ट, पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार आहे. ही कार अरूंद वळणावरही सहज वळते तसेच चालत असताना आकार बदलू शकते. ही कार पूर्णपणे इलेक्ट्रीकल असून चालविण्यापूर्वी ती चार्ज करावी लागेल. कंपनीने ही कार पूर्णपणे इकोफ्रेंडली असल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment