या रोबोलाही व्यायाम करताना येतो घाम


जपानच्या टोक्यो विद्यापीठातील संशोधकांनी दीर्घ काळच्या संशोधनातून केंगोरो नावाच्या ह्युमनाईज्ड रोबो तयार केला आहे. हा रोबो माणसाच्या शरीराप्रमाणे असल्याने त्याला ह्युमनाईज्ड असे म्हटले गेले असून हा रोबोही माणसाप्रमाणेच व्यायाम करताना घाम गाळतो.जपानमध्ये गेली अनेक वर्षे ह्युमनाईज्ड रोबो विकसित केले जात आहेत. २००१ मध्ये तयार केल्या गेलेल्या केटा रोबोनंतर त्यात आता खूपच सुधारणा केली जात आहे.

माणसाप्रमाणेच हा रोबो उठाबश्या, पुशअप्स असे सर्व व्यायाम करतो. या रोबोमध्ये प्रथमच कृत्रिम घाम येणारी म्हणजे पर्सप्सिरेशन सिस्टीम बसविली गेली आहे. व्यायाम करताना हा रोबो गरम होतो व उष्णतेपासून त्याचा बचाव करण्यासाठी बसविलेल्या या सिस्टीममुळे त्याच्यामध्ये पाणी प्रवाहित होते. हे पाणी वाफेच्या रूपात रोबोच्या शरीराबाहेर टाकले जाते. परिणामी रोबोला घाम येतो.

Leave a Comment