चीनची मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी झेडटीईने नवा ड्यूल स्क्रीन फोन अॅक्सॉन एम लवकरच चीनी बाजारपेठेत दाखल होत असल्याचे संकेत दिले असून त्यानंतर तो जगभराच्या बाजारातही दाखल होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन असून दोन्ही स्क्रीनवर एकाचवेळी दोन अॅप्लीकेशन ओपन करण्याची सुविधा दिली गेली आहे.
फोनवर एकाच वेळी पहा मूव्ही आणि चालवा फेसबुकही
या स्मार्टफोनसाठी ६ इंची स्क्रिन दिला गेला आहे. हा ड्युल स्क्रीन असून त्यात एकाचवेळी एका स्क्रीनवर मूव्ही पाहणे व दुसर्या स्क्रीनवर फेसबुक चालविणे अशा प्रकारची दोन अप्लीकेशन युजर वापरू शकणार आहे. या स्मार्टफोनसाठी ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, स्नॅपड्रॅगन ८२१ हा वेगवान प्रोससर, अॅंड्राईड नगेट ७.१.२ ओएस, २० एमपीचा रियर कॅमेरा व ३१८० एमएएच ची बॅटरी अशी अन्य फिचर्स आहेत.