केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय; २ हजारपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क माफ


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाने गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार डेबिट कार्ड, भीम अॅप तसेच इतर देयकांद्वारे २ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार केल्यास ग्राहकांना आता व्यवहार शुल्क भरावा लागणार नाही आहे. व्यापारी २ हजार रुपयांपर्यतच्या डिजीटल व्यवहारांवर सवलत दर आकारला जाणार आहे. मंत्रीमंडळाने हा निर्णय डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला आहे.

भीम अॅपद्वारे डिसेंबरच्या तिमाहीमध्ये व्यवहार ८६ टक्क्यांनी वाढून १४५.६ दशलक्षांवर पोहोचला असून १३,१७४ कोटींचा महसूल त्यातून मिळाला आहे. डेबिट कार्ड किंवा भीप अॅपद्वारे केलेल्या २ हजारपर्यंतच्या व्यवहारांवरचे व्यवहार शुल्क डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार भरणार आहे. तसेच व्यापारांना शुल्क नसणार आहे, अशी माहिती वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

डेबिट कार्ड, भीम अॅप तसेच इतर देयकांद्वारे २ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहारांवर २ वर्षांसाठी १ जानेवारी २०१८ पासून व्यापारी सवलत कर हा लागू करण्यात आला आहे. सरकार बँकांना याची भरपाई करणार आहे. सरकारी तिजोरीवर या निर्णयामुळे २,५१२ कोटींचा भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment