रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये गुंतवणूक करणार आनंद महिंद्रा ?


सोशल मीडियावरील आपल्या विधानांमुळे महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा अनेकदा चर्चेत असतात. आयुष्य सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे जगावे, हे सांगण्यासाठी त्यांनी मध्यंतरी शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आनंद महिंद्रा त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नुकताच एक व्हिडिओ शेअर ट्विटरवरील काही युजर्सनी केला होता. हा व्हिडिओ मंगलोरमध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या महिलेचा असून या महिलेने महिंद्राच्या बोलेरो गाडीत फुड सेंटर उभारले आहे. सोशल मीडियावर या अनोख्या फूड सेंटरचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत होता. ही गोष्ट ट्विटरवरील काही युजर्सनी आनंद महिंद्रा यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि ते यामुळे खूपच प्रभावित झाले. या महिलेला व्यवसायात मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली. या महिलेला मदतीची गरज नसली तरी आपण तिच्या व्यवसायात गुंतणवूक करू. जेणेकरून व्यवसाय वाढायला मदत होईल. साहजिकच महिलेसाठी आनंद महिंद्रांचा हा प्रस्ताव स्वप्नवत होता. तर दुसरीकडे अनेक युजर्सनी आनंद महिंद्रा यांनी दाखवलेल्या मोठेपणाचे कौतुक केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगलोरमधील शिल्पा यांचा हा व्हिडिओ असून महिंद्राच्या बोलेरो गाडीचे रुपांतर त्यांनी फूड सेंटरमध्ये केले आहे. कानडी पद्धतीचे खाद्यपदार्थ याठिकाणी त्या विकतात. त्यांचे हे फूड सेंटर उत्तम चवीमुळे चांगलेच लोकप्रिय झाले आहे. या फूड सेंटरचा व्हिडिओ येथील काही ग्राहकांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

Leave a Comment