नव्या वर्षात येणार दोन धाकड बाईक्स


दिल्लीमध्ये आयेाजित होणार्‍या ऑटो एक्स्पो मध्ये नवनव्या कार्स शोकेस करण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असतानाच दोन बाईक्सही आपली हजेरी लावणार आहेत. त्यातील एक आहे नॉर्टन कमांडो ९६१ व दुसरी आहे कावासाकी झेड ९०० आरएस.

पैकी नॉर्टन कमांडो ९६१ ही नॉर्टन व भारत यांच्या जॉईंट व्हेचरमधून तयार झालेली पहिलीच मोटरसायकल आहे. या बाईकला ९६१ सीसीचे पॅरलल ट्वीन इंजिन, पाच स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. भारतीय रस्त्यांना सूट होईल असे सस्पेंशन ही तिची खासियत असून ती भारतातच असेंबल केली जात आहे.मे महिन्याच्या सुमारास ही बाजारात दाखल होईल. तिची अंदाजे किंमत २० लाख असेल असे समजते.


कावासाकी झेड ९०० आरएस दोन व्हेरिएंटमध्ये सादर केली जाणार आहे. ५० च्या दशकातील बाईक प्रमाणे तिचे डिझाईन असून या बाईकला ९४८ सीसीचे इन लाईन चार सिलींडर इंजिन, सहा स्पीड ट्रान्समिशन व स्लीप असिस्टंटसह दिले गेले आहे. झेड ९०० आरएस व झेड ९०० आरएस कॅफे रेसर अशी दोन व्हेरिएंट यापूर्वीच सादर केली गेली आहेत. ही बाईकही मेमध्येच भारतीय बाजारात दाखल होईल असे समजते.

Leave a Comment